26.6 C
New York

Manu Bhaker : मनू भाकर सूर्यकुमार यादवकडून शिकते क्रिकेट

Published:

भारतासाठी पॅरिस ऑलम्पिक 2014 मध्ये दोन पदके जिंकून इतिहास घडवणारी नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) नवीन खेळाचे आजकाल बारकावे शिकत आहे. तिने नुकतीच घोडेस्वारी, स्केटिंग भरतनाट्यम शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता ती क्रिकेट शिकतानाही आपल्याला दिसत आहे. भारताचा टी -20 कर्णधार सूर्यकुमार यादव सोबतचा एक फोटो तिने रविवारी शेअर केला. या फोटोला तिने सुंदर कॅप्शनही दिल आहे.

तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या एका कॅप्शन मध्ये असं लिहिलं आहे की, मी भारताच्या मिस्टर 360 यांच्यासोबत नवनवीन खेळाचे तंत्र शिकत आहे. या फोटोमध्ये मनू भाकर आपल्याला बॅटिंग पोज देताना दिसत आहे. सूर्यकुमार यादव ला संपूर्ण मैदानातील विविध शॉर्ट खेळण्याच्या क्षमतेमुळे त्याला मिस्टर 360 म्हटले जाते. एबी डिव्हिलियर्स या दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटू यांच्यामुळे हे नाव लोकप्रिय झाले होते. म्हणून सध्या पॅरिसमध्ये इतिहास रचल्यानंतर तीन महिन्यांच्या विश्रांतीवर आहे. आणि आता ती भारतीय संघाच्या टी 20 कर्णधाराकडून क्रिकेटचे तंत्र शिकत आहे.

सोशल मीडियावरचा हा फोटो पाहून चाहते मात्र खुश झाले आहेत. “भारताचे दोन सुपरस्टार” आजच्या दिवसातील सर्वात सुंदर फोटो. असे एका युजरनेदेखील म्हटले आहे. “एका फ्रेम मध्ये दोन चॅम्प्स”. असं देखील एका युजरने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img