23.1 C
New York

Mahavikas Aghadi : ‘मविआ’ची एक्सपायरी डेट संपत आली; जागावाटपावरून भाजपची टीका

Published:

मुंबई

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) एक्सपायरी डेट जवळ आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन घटक पक्षांचा समावेश आहे. हे तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे डोळे लावून बसले आहेत, असे आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. बहुधा जागावाटपाच्या मुद्द्यावरून त्यांच्यातील युती तुटण्याच शक्यता आहे. जर जागावाटपाच्या काही झाले नाही, तर निवडणुकीनंतर युती तुटणार हे निश्चित आहे. कारण तीनही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार म्हणाले की, एसआयटीची व्याप्ती वाढवावी आणि संघटित आणि सुनियोजित आंदोलनातील राजकीय षड्यंत्राचीही चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना करतो. आई-वडील आणि शेजाऱ्यांचा राग आपण समजू शकतो, पण राजकीय लोक काय योजना आखत होते, याचीही चौकशी व्हायला हवी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img