23.1 C
New York

Jayant Patil : जयंत पाटील लवकरत भाजपत येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Published:

छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. ते लवकरच भाजपत (BJP) जाणार असल्याचं वारंवार बोललं जातं. आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नाराजीवर भाष्य करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणीही कुठेही जाऊ शकतं. आमच्या गटात किती जण येतात तेही लवकरच कळेल. जयंत पाटील हे शरद पवार गटात अस्वस्थ आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) वारंवार त्यांचा अपमान करतात. कदाचित ते भाजपच्या वाटेवर आहेत, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास यांनी आंदोलन केलं. त्यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध केला. अंबादास दानवे हे कुठे होते, मला माहित नाही. त्यांनी विरोध केला हे मला माहित नाही. दानवे यांना काय करावे हे सुधरत नाही ते आधी नौटंकी करण्याच्या मार्गावर आहेत. विरोधाला विरोध म्हणून हा छोटासा त्यांनी प्रयोग केला आहे. नेमकं यांना करायचं काय हे समजू द्या. हे नौटंकीच आहे दुसरा शब्द नाही. दानवे यांच्यावर कमेंट करणं म्हणजे त्यांना वाढवा देणं होय, असं संजय शिरसाट म्हणाले.

संजय राऊत यांचं डोकं फिरलेला आहे. त्याला अनेक दिवसापासून पागल खाण्यामध्ये जाण्याची घाई झालेली आहे किंवा जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे. मिमिक्री करणाऱ्या लोकांना तंबू घेऊन गावोगाव नाचाच काम करावे लागेल. जनतेचा पैसा जनतेकडे गेले पाहिजे लंडनला गेला पाहिजे नाही. लंडनला पैसे कशाला पाठवतात देशाची संपत्ती देशात असली पाहिजे. आपल्या बापाचा माल समजून आपण तो दुसरीकडे नेऊन ठेवला नाही पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले.

राज ठाकरे हे आपल्या पद्धतीने राजकारण करत आहेत. तुमच्यासारखे दलाली करत नाहीत. नाव उद्धव ठाकरे ना शरद पवार यांचे ते सेवक नाहीत. दलाला ची किंमत नसते. धान खाणारा पोपट म्हणजे संजय राऊत आहे. मोदी यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे. म्हणून त्यांच्यावर दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही. घरात बसून राजकारण करता येत नाही हे मोदींकडून यांनी शिकले पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img