16.8 C
New York

Kolkata Rape Case : ‘आरजी कर’ भ्रष्टाचारात 15 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, संदीप घोष गोत्यात

Published:

कोलकत्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि (Kolkata Rape Case) रुग्णालयाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयच्या दाढी आता पडल्या आहेत. तपास यंत्रणेची विविध पथके कोलकात्यातील हावडा, एंटाली, केष्टोपूर येथे दाखल झालेत. आरजी कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे प्राचार्य संदीप घोष व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरी आता छापे टाकण्यात आलेत यामुळे कोलकात्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संदीप घोष यांच्या घरी एक टीम दाखल झाली. ही टीम छापा टाकण्याच्या आधीच एक तास संदीप घोष यांच्या घराबाहेरच उभी होती. यानंतर घोष घराच्या बाहेर आले आणि त्यांनी दरवाजे उघडला. सकाळी तब्बल आठ वाजता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संदीप घोष यांच्या घरात एन्ट्री मिळाली. तसेच घोष यांच्याप्रमाणेच कॉलेजचे माझी एम एसविपी संजय बशिष्ट, मेडिकल सप्लायर आणि कीष्टोपूर येथील फॉरेन्सिक विभाग प्रमुख देवाची सोम यांचीही चौकशी केली जातेय.

साताऱ्यात शरद पवारांचा डाव! भाजपला मोठा फटका बसण्याचीह शक्यता

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संदीप गोशांच्या घराची झडती घेण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त देखील घेतला होता. यादरम्यान संदीप घोष यांच्या घराबाहेर कोलकाता पोलीस दलाचे पथकही दिसून आले. तर दुसरीकडे सीबीआयला एसआयटीने कागदपत्र देखील दिले आहेत. माजी प्राचार्य संदीप घोष यांना उच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यकाळात आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या अनियमिततेचा तपास आता सीबीआय कडे सोपवलाय.

Kolkata Rape Case संदीप घोष यांच्यावर नेमका आरोप काय?

माझी प्राचार्य संदीप घोष यांच्यावरती अख्तर अली यांनी अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. राज्यदक्षता आयोगाला जुलै 2023 मध्ये लेखी तक्रार देण्यात आली होती. पण मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. यामध्ये जे जे कोणी सामील असतील त्या सर्वांचा पर्दाफाश व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा असल्याचं अली आणि सांगितले. रुग्णालयामध्ये जमा होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची विक्री करणे तसेच विविध उपकरणांच्या पुरवठादारांकडून कमिशन काढून टेंडर पास करणे व परीक्षेमध्ये पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप संदीप घोष यांच्यावरती करण्यात आले होते

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img