23.1 C
New York

PM Narendra Modi : पीएम मोदींच्या दौऱ्याला विरोध, अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Published:

छत्रपती संभाजीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जळगावमध्ये पीएम मोदी येणार आहेत. मोदी यांच्या दौऱ्याला महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दौऱ्याला विरोध केला आहे. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी करत हा विरोध करण्यात आला. विमानतळाच्या (Airport) दिशेने जाणाऱ्या अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आम्हाला आमच्या पंतप्रधानांची काळजी आहे. ते विरोधी पक्षाचे असले तरी आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. आम्हाला देखील त्यांची काळजी आहे. मात्र, आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना आम्हाला अटक कशाला करता, असा सवाल दानवे यांनी केला आहे. तसंच, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणाले की, राज्यात आणि देशात महिला अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र केंद्राचे सरकार डोळ्यावर पट्टी बांधून हे सर्व पाहत आहे. त्यामुळे आम्ही देखील तोंडाला पट्टी बांधून सरकारचा निषेध करत आहोत.

महिलांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत त्यामुळे सरकारने यावर पावले उचलावीत यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं नेते सांगत होते. महाविकास आघाडीच्यावतीने विमानतळ रोडवर जवळपास एक तास हे आंदोलन करण्यात आलं. मातोश्री लॉन ते चिकलठाणा विमानतळपर्यंत निषेध व्यक्त करण्यात आला. खबरदारी म्हणून यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img