23.1 C
New York

Shinde Group : महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या; शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

Published:

अमरावती

महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, असे वक्तव्य शिंदे गटाच्या (Shinde Group) पदाधिकाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली. अमरावती येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी (Amravati Hindu Morcha) विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी केलेल्या वक्तव्याची एकच चर्चा झाली. महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका प्रथितयश शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असतानाच पुढील काही दिवसांत पुणे, सातारा, अकोला यासारख्या काही भागांतही महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या.

या सर्व घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार टीकेच्या केंद्रस्थानी असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसेना नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावती जिल्ह्यातील महिलांना बंदूक वापरण्याचा परवाना द्यावा अशी मागणी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बांगलादेशात हिंदू समाजासोबत जे काही घडत आहे ते आपण पाहत आहोत. नरेंद्र मोदी हे एक कर्मठ माणूस आहेत आणि याविरोधात ते काहीतरी कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्यातही ज्या काही घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्री साहेब त्याची दखल घेत आहेत. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.

मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी महिलांना रिव्हॉल्वर वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषकरुन त्यांनी जर ही परवानगी दिली तर अमरावतीत मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे रिव्हॉल्वहर घेऊन देईन. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आता रिव्हॉल्वर वापरावी. यात दोन-चार चांगली माणसं मेली तरी हरकत नाही पण वाईट लोकं आता वाचली नाही पाहिजेत. याची जबाबदारी मी घेऊन, कोर्ट-कचेरीचा खर्चही मी करायला तयार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img