28.9 C
New York

UBT Shivsena : ठाकरे गटाकडून शिवसेना भवनाबाहेर भर पावसात तीव्र आंदोलन

Published:

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आंदोलन छेडले आहे. (UBT Shivsena)बदलापूरमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यामुळे राज्यभरातून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण सध्या हाय कोर्टामध्ये सुरु असून सुनावणी सुरु आहे. याच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते सर्व नेते रस्त्यांवर उतरले आहे. शिवसेना भवन बाहेर ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. या मुक आंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहे. शिवसेना भवनाबाहेर तोंडाला काळे मास्क लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन अत्याचार प्रकरणाचा निषेध दर्शवला जात आहे.

शिवसेना भवनाबाहेर काळा स्टेज देखील उभारण्यात आला आहे. या मूक आंदोलनामध्ये घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत देखील सामील झाले आहेत. तोंडाला काळा मास्क लावून उद्धव ठाकरे यांनी निषेध दर्शवला आहे. लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरुच राहणार असा निश्चय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘फाशी दो’ अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे देखील सामील झाले आहेत.

यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरोधात आणि महायुतीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नको आम्हाला दीड हजार.. कंस मामा सुरक्षा द्या…फाशी द्या…शिंदे गटाला पोत्यात बांधा.. अशा घोषणाबाजी केली. यावेळी तरुणी, महिला आणि अगदी वृद्ध महिला देखील आंदोलनामध्ये सामील झाल्या आहेत. चिमुरड्यांना न्याय द्या.. नराधमांना फाशी झाली पाहिजे… अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मुंबईमध्ये भर पावसामध्ये शिवसेना भवन परिसर घोषणाबाजीने दुमदुमला आहे.

भर पावसात सुप्रिया सुळे सरकारवर कडाडल्या..

UBT Shivsena काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आंदोलनस्थळावरुन उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर ऩिशाणा साधला. ठाकरे म्हणाले, “आम्ही बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र नराधमांची बाजू घेणाऱ्या काही लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली. कोर्टाने आमच्या महाराष्ट्र बंदबाबत विरोध केला. पक्षाबाबत निर्णय देताना तातडीने दिला जात नाही. मात्र आमच्या बंदबाबत लगेच निर्णय देण्यात आला. मात्र आता आम्ही राज्यभरामध्ये मूक आंदोलन केले आहे. राज्यामध्ये निर्लज्ज सरकार असून हे सगळे कंस मामा आहेत. आम्हाला लाडकी नको तर सुरक्षित बहीण हवी आहे. आमच्या महाराष्ट्र संस्कारक्षम महाराष्ट्र आहे. मात्र यामध्ये विकृत सरकार असून नराधमावर पांघरुन घालत आहेत. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित राहणार आहे. यासाठी स्वाक्षरी मोहिम घेऊन या सह्या सर्वौच्च न्यायालयाला पाठवणार आहोत. आमचा बंद नाकारुन तुम्ही आमचा आवाज बंद करु शकत नाही. आमच्या बहीणींचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही शक्ती कायदा आणू, यासाठी आम्ही महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कायदा आंमलात आणण्याचे आवाहन करतो,” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

UBT Shivsena महाविकास आघाडीचे मूक आंदोलन

बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राज्यामध्ये लाडकी बहीण नाही तर सुरक्षित बहीण हवी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज (दि.24) दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंदची हाक विरोधकांकडून देण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने फटकारल्यानंतर मविआने महाराष्ट्र बंद मागे घेतला. मात्र राज्यभरातून महाविकास आघाडीचे सर्व नेते मुक मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर या अत्याचाराच्या वाईट प्रवृत्तीविरोधात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img