16.8 C
New York

Ramdas Athavle: ‘RPI’ला मिळालं हे नवे चिन्ह, आता कमळावर निवडणूक लढणार नाही,

Published:

Ramdas Athavle: ‘RPI’ला मिळालं हे नवे चिन्ह, आता कमळावर निवडणूक लढणार नाही,आगामी विधानसभेची तयारी आता सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांकडून आता मेळावे, यात्रा काढून विधानसभा निवडणुकीसाठी चांगलं वातावरण करण्याचं प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा (RPI)‘आरपीआय’ पक्ष देखील मागे राहिलेला नाहीय. २५ ऑगस्ट ला रामदास आठवले आता पुण्यात पक्षमेळावा घेणार असून, याबदल मोठ्या घोषणा देखील करण्यात येत आहेत. मात्र या घोषणा आता महायुती आणि भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या घोषणा असल्याचं बोललं जातंय.

‘आरपीआयला’ अधिकृत चिन्ह नसल्यामुळे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढत होते. मात्र आता विधासभेसाठी निवडणूक आयोगानं ‘आरपीआयला’ नवीन चिन्ह दिल आहे. या चिन्हाच लोकार्पणही मेळाव्यात होणार आहे.

आगामी विधानसभेत ‘आरपीआय’ला हव्यात 12 ते 15 जागा

घटक पक्ष म्हणून ‘आरपीआय’ 12 ते 15 जागा मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे. तसेच ‘आरपीआय’ कोणत्या जागांवरती दावा करणार याचीही घोषणा मेळाव्यातून करण्यात येणार आहे. पुण्यातील वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन जागांवर ‘आरपीआय’ने दावा केला आहे.’आरपीआय’चे नेते पिंपरीची जागा मिळण्यासाठी मागणी करणार आहेत. त्यामुळे आठवले आता मित्रपक्षांच टेन्शन वाढवणार असल्याचंही बोललं जातंय. विधासभा निवडणुकीत जेर आम्हाला जागा दिल्या नाही तर, आंबेडकरी जनतेमध्ये नाराजी वाढेल. आणि त्याचा फटका महायुतीला बसलेला दिसेल, असा देखील इशारा या मेळाव्याच्या माध्यमातून ‘आरपीआय’ महायुतीला देण्याचा प्रयत्न करणार आहे.

मोदींसाठी रशियाची मोठी घोषणा…

‘आरपीआय’ला मिळाले नवीन चिन्ह

आरपीआय’ पक्षाकडे आपले अधिकृत चिन्ह नव्हते. त्याचमुळे आरपीआयच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. मात्र आता आगामी विधानसभेसाठी आयोगाने आरपीआयला “ऊस धारक शेतकरी” हे चिन्ह घोषित केलय. या चिन्हाच अनावरण रविवारी होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. इथून पुढच्या सर्व निवडणूका ‘ऊस धारक शेतकरी’ या चिन्हावर लढवणार असल्याचं या मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img