Mega Block :लोकल मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. लांबच्या प्रवासासाठी लोकल खूप महत्वाची ठरते. लाखो प्रवाशी दररोज लोकल ने ये -जा करतात. मात्र सुट्टीच्या दिवशी लोकल ला फारच गर्दी असते त्यामुळे सर्वसामान्य माणसांची थोडी धावपळ होते. त्यामुळे त्यांना थोडा त्रास सहन करावा लागतो. लोकलच्या काही तांत्रिक कामासाठी रेल्वे मार्गांवरती मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे रविवारी रेल्वेच वेळापत्रक पाहूनच लोकांना कामासाठी बाहेर पडाव लागत.या (Railway Block)रेल्वेब्लॉक दरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच पुढचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलय .
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत मध्य रेलवेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या दरम्यान, लोकलच्या काही फेऱ्या रद्द तर, काही फेऱ्या विलंबाने धावतील. मात्र, जलद मार्गाच्या लोकलच्या फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ दरम्यान मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान, लोकलच्या काही फेऱ्या विलंबाने धावतील तर काही फेऱ्या रद्द होतील. जलद मार्गावरच्या लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
भारताचं पहिलं पुन्हा वापरता येणारं हायब्रीड रॉकेट लाँच; अंतराळात मोठं यश
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप-डाऊन,ठाणे ते पनवेल अप-डाऊन या मार्गावरील लोकल उद्या बंद राहतील. या ब्लॉक कालावधी दरम्यान, सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि नेरुळ बेलापूर या मार्गावरील लोकलसेवा उद्या सुरु राहील.
अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावर उद्या ब्लॉक असेल. त्यामुळे पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर रेल्वेसेवा उद्या बंद असेल. या कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.