19.7 C
New York

Hybrid Rocket : भारताचं पहिलं पुन्हा वापरता येणारं हायब्रीड रॉकेट लाँच; अंतराळात मोठं यश

Published:

भारताचं पहिलं रियुजेबल हायब्रिड रॉकेट RHUMI-1 (Hybrid Rocket)  यशस्वीपणे लाँच करण्यात आले आहे. भारताने आणखी एक मोठी कामगिरी अंतराळ क्षेत्रात केली आहे. लाँचिंगसाठी मोबाइल लाँचरचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच रॉकेटला कुठूनही लाँच करता येऊ शकते. रॉकेट स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी मिळून तयार केले आहे. तीन क्यूब सॅटेलाइट्स आणि 50 PICO सॅटेलाइट्स या रॉकेटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

सब ऑर्बिटल मध्ये प्रक्षेपित करण्यात आले आहे. हे सॅटेलाइट्स ग्लोबल वॉर्मिंग आणि जलावायू परिवर्तनाचा अभ्यास करून त्याची माहिती पाठवणार आहेत. रूमी 1 रॉकेटमध्ये जेनेरिक फ्यूल आधारित हायब्रीड मोटार आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर्ड पॅराशूट डेप्लॉयर आहेत. सॅटेलाइट सोडल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने रॉकेट पुन्हा वापस येणार आहे. यामध्ये पायरोटेक्निकचा वापर केलेला नाही. RHUMI रॉकेट मिशन आनंद मेगालिंगम यांनी पूर्ण केले आहे. आनंद स्पेस झोन कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी रॉकेट तयार करण्यासाठी आणि मिशनसाठी इस्त्रो सॅटेलाइट सेंटरचे माजी निर्देशक डॉ. एम. अन्नादुराई यांचे मार्गदर्शन घेतले.

ऑफिसचं काम घरी आणायचंच नाही, बॉसचा फोन आला तर… घाबरू नका

रूमी 1 रॉकेटमध्ये लिक्विड आणि सॉलिड फ्यूल प्रोपेलंट सिस्टिम आहे. यामुळे ऑपरेशनमध्ये खर्च कमी येईल आणि कार्यक्षमताही वाढेल. स्पेस झोन इंडिया एक एयरो टेक्नोलॉजी कंपनी आहे. ही कंपनी कमी किंमतीत टेक्नोलॉजी आणि सुविधा देऊ इच्छिते. रूमी 1 रॉकेटचे वजन 80 किलोग्रॅम आहे. या रॉकेटचा 70 टक्के हिस्सा पु्न्हा वापरता येण्यासारखा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img