बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधकांचा महराष्ट्र बंद रद्द झाला. यानंतर आज महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भर पावसात आंदोलन केले. या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह स्थानिक नेते आंदोलनात उतरले आहेत. काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध केला जात आहे. विशेष म्हणजे भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. इतकं असंवेदनशील सरकार मी कधी पाहिलं नाही, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.
Supriya Sule मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू
भर पावसात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. दौंडमध्ये काल मी गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहे. त्यामुळे त्या पालकांना धीर देण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ देऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू या. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. बदलापूर आंदोलनात बाहेरची लोक होती, असे सत्ताधारी म्हणत होते, मात्र बाहेरचे लोक असले तरी घटनेचा निषेध महत्वाचा आहे.
पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोलन
Supriya Sule …तर मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करु
गुंडांना आता पोलिसांची भीती राहिली नाही. कोयता गँग, रक्त नमुने बदलणे अशा घटना पुण्यात घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणत होते पुणे जिल्ह्यात एका अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशी दोन महिन्यांत आहे. सरकार असंवेदनशील आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा आपण निषेध करतो
Supriya Sule सरकार असंवेदनशील
बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते, असे सरकार म्हणते. बदलापूरच्या लेकीसाठी परंतु लोक कोणीही असो ते भारतीय होते आणि एकत्र आले. हे सरकार असंवेदनशील आहे. इतक गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.