डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील शिवमंदिर येथील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.प्रशासनाचे लक्ष नसल्याने गळके छत, भिजलेली लाकडे, अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.शुक्रवार दुपारपासून तेथे २९ जणांचे अंत्यसंस्कार झाले, सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली.
शनिवार 24 तारखेला कृष्णा गायकवाड(७८) यांच्या अंत्यसंस्काराला डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर येथील वैकुंठ स्मशानभूमीत महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली. ओली लाकडे, गळकी छत, अग्नी भडकता रहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे. सगळ्याच ठिकाणच्या अग्नी कुड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती.सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे? महापालिका करतेय काय? असे नागरिक म्हणत होते.१० रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळतीविना नाही.
पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश
स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते, त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागले. तेथे डेंग्यूची अवस्था आहे. जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती. आलेल्या नागरिकांचा घाण, दर्प यामुळे श्वास घुसमटला. ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले. त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला. स्वच्छतागृहात देखील घाण होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक तथा डोंबिवली पश्चिम गरीबाचा वाडा विभाग प्रमुख प्रमोद कांबळे हेही यावेळी उपस्थित होते. स्मार्ट सिटीतील या शहरात स्मशानभूमीची अशी दुरावस्था आहे.पालिका प्रशासनने याकडे का लक्ष दिले नाही? असे यावेळी कांबळे म्हणाले.