राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. आता मात्र मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सर्वत्र जोरदार (Heavy Rain) पाऊस होत आहे. शु्क्रवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आताही हवामान विभागाने पावसाबाबत नवा इशारा (Rain Alert) जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्या दुपारनंतर अनेक जिल्ह्यांत पाऊस होईल.
हवामान विभागानुसार पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात (Yellow Alert) आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस होईल. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, काल नगर जिल्ह्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळीही ढगाळ हवामान असून हलक्या पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कामावर निघालेल्या लोकांचे हाल झाले. मुसळधार पावसाची शक्यता पूर्व विदर्भात व्यक्त करण्यात आली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा ‘SIT’कडून प्राथमिक रिपोर्ट सादर
राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सरासरी हजार मिमीचा टप्पा मुंबईतील पावसानं ओलांडला आहे. तर, अवघ्या 14 दिवसांत जुलै महिन्याची सरासरी पूर्ण करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा जुलै मध्यपर्यंतच पावसानं पार केला आहे.
जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाने ब्रेक घेतला. आता मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस होऊ लागला आहे. यामुळे शेतातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अनेक भागात खरीप हंगामातील पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता पावसाने हजेरी लावल्याने पिकांना पाणी मिळाले आहे.