23.1 C
New York

Assembly elections  : अंतरवाली सराटीत इच्छुकांची भाऊगर्दी; सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश

Published:

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुका (Assembly elections) तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या निवडणुकीची घोषणा होण्याची सर्वच जण वाट पाहत असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांनीही उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांत मनोज जरांगे यांची अनेक नेत्यांनी भेट घेत त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकासाठी आतापासूनच इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील विधानसभा इच्छुकांची रांग लागली आहे. विशेष म्हणजे महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेही जरांगे पाटलांना भेटत आहेत.

महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढवायची का, याबाबतची बैठक पुढे ढकलली असली तरी शुक्रवारी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जिल्ह्यातील बीड, परळी, केज मतदारसंघातील इच्छुकांची आढावा बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील चळवळीत पदाधिकाऱ्यांसह आघाडी व महायुतीचे नेतेही उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत कुठे? राज ठाकरेंचा सवाल

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे बळीराम गवते, माजी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, भाजपचे राजेश देशमुख, शिवसंग्राम पक्षाचे प्रभाकर कोलंगडे, स्वप्नील गलधर, चंद्रकांत नवले, हारुण इनामदार, दिलीप गोरे, हनुमान मुळीक, गंगाधर काळकुटे, माधव जाधव, गोकुळ जाधव, अनिल घुमरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. गेल्या चार दिवसांत जरांगे यांची भेट अनेक नेतेमंडळींनी घेतली आहे.

दरम्यान, आठ दिवसापूर्वी अंतरवाली सराटीत येत नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या मिनल खतगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img