21 C
New York

Congress party : काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत ‘आप’ ?

Published:

हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Elections 2024) आम आदमी पार्टी आणि जनता जननायक पार्टी (JJP) यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनी सांगितले की आमचा पक्ष राज्यातील सर्व 90 जागांवर उमेदवार देणार आहे. आम् आदमी पार्टीबरोबर (AAP) आमची कोणतीही आघाडी नाही. जर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात (Congress party) आघाडी झाली नाही तर जेजेपी आम आदमी पार्टीबरोबर निवडणूक लढू शकते. दुष्यंत चौटाला यांनी जरी आघाडी नसल्याचे सांगितले असले तरी भविष्यात आघाडी होणारच नाही असेही नाही.

Congress party निवडणुकीत नवी समीकरणे

माजी मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने भूपेंद्र हुड्डा (Bhupinder Singh Huda) असल्याने राज्यसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार (Rajya Sabha Elections) दिला नाही. पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना चौटाला म्हणाले राज्यातील सर्व 90 मतदारसंघात आपण उमेदवार देणार आहोत. यावेळी विधासभेचे कुलूप जजपाच्याच चावीने उघडेल. आता 1 सप्टेंबरच्या आधी राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल आणि यादीला अंतिम रूप देण्यात येईल.

महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

काँग्रसने राज्यसभा निवडणुकीत उमेदवार दिलाच नाही कारण भूपेंद्र सिंह हुड्डा तुरुंगात जायला घाबरत आहेत. भाजपबरोबर त्यांचे साटेलोटे आहे. काँग्रेसकडे 30 आमदार आहेत आणि जजपा कडे फक्त तीन आमदार आहेत. आम्ही उमेदवारी दाखल करू शकत नव्हतो पण आम्ही आधीच सांगितले होते की जर काँग्रेसने उमेदवार दिला तर आम्ही साथ देऊ पण हुड्डा हिंमत दाखवू शकले नाहीत कारण त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागली आहे, असे दुष्यंत चौटाला म्हणाले.

Congress party दलबदलूंचा जेजेपीला सर्वाधिक फटका

नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्याने जनता जननायक पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. राम करण काला काँग्रेसमध्ये गेले तर दोन आमदार केव्हाही भाजपात प्रवेश करू शकतात. तर दुसरीकडे चार बंडखोर आमदारांनी अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत. टोहाना मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र बनली यांनी सांगितले की मी लवकरच समर्थकांची एक बैठक आयोजित करणार आहे. भविष्यातील योजनांची घोषणा याच बैठकीत करणार आहे. दोन आमदारांनी भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार किरण यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. आता हे दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img