केएल राहुल (KL Rahul) भारताचा अनुभवी फलंदाज आणि विकेटकिपरला बरेच दिवस भारतीय संघामध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर श्रीलंका मालिकेमध्ये आता काही दिवसांपूर्वी झालेल्या त्याला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आले होते. त्याचबरोबर त्याला विश्वचषकामधून सुद्धा वगळण्यात आले होते. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे केएल राहुल चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर केएल राहुलने निवृत्तीची घोषणा केली होती. पुन्हा काही वेळानंतर त्यानंतर ती पोस्ट त्याने डिलिट केली आहे. त्यामुळे त्याने नक्की केएल राहुलच्या डोक्यात चाललंय काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध मालिकेमध्ये तो खेळला होता. त्यामध्ये त्याने २सामन्यांमध्ये ३१ धावा केल्या होत्या. यावेळी सोशल मीडियावर आधी केएल राहुलने एक पोस्ट शेअर केली होती यामध्ये तिने लिहिले होते की, ” मला एक घोषणा करायची आहे” असे त्याने त्याच्या स्टोरी लिहून पोस्ट केली होती. पहिल्या स्टोरीनंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्याने लिहिले की, “खूप विचार केल्यानंतर, मी माझी निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक क्रिकेटमधून हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते.
अनेकजण माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग वर्षे माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझे कुटुंब, मित्र, सहकारी आणि चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर मला मिळालेले अनुभव आणि आठवणी खरोखरच अनमोल आहेत. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा आणि अनेक प्रतिभावान व्यक्तींसोबत खेळण्याचा मला सन्मान वाटतो. मी पुढे असलेल्या नवीन अध्यायाबद्दल उत्सुक असताना, मी खेळात घालवलेल्या वेळेची नेहमी कदर करेन. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. परंतु ही पोस्ट त्याने काही वेळानंतर डिलीट केली आहे त्यामुळे त्याने खरंच निवृत्तीची घोषणा केली आहे की, नाही यावर अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.