3.6 C
New York

Ladki Bahin : पोलिस महासंचालिकांना ‘लाडकी बहीण’ व्हायची असेल…,काय म्हणाले उद्धव ठाकरे

Published:

मुंबई

बदलापूर अत्याचारप्रकरणाचा (Badlapur Rape Case) निषेधासाठी महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा बंद विकृतीविरुद्ध संस्कृती असा असून, राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी राज्याची ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin) होण्याची संधी आहे. त्यासाठी उद्या बंदवेळी राज्यातील संपूर्ण पोलिसांना एक आवाहन करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी रश्मी शुक्ला यांना दिला.

महाविकास आघाडीने उद्या शनिवार 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या संदर्भात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलिस महासंचालकांनाच आवाहन केले आहे. ते म्हणाले की हिंसा होऊ नये ही इच्छा आहे. पोलीस महासंचालिका महिला आहेत. त्या पहिल्या महिला संचालिका आहेत. त्यांना संधी आहे. त्या महाराष्ट्राची लाडकी बहीण होऊ शकतात. बंदच्या आड त्यांनी येऊ नये, असे आदेश पोलीस महासंचालिका आपल्या पोलिसांना देऊ शकतात. बाकी मुख्यमंत्री रक्षा बंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणींची मते विकत घेऊ शकता तर माझ्या महाराष्ट्राच्या बहीणी एवढ्या विकाऊ नाहीत.बंद हा बंद असतो. नागरिकांना विनंती करतोय बंदमध्ये सहभागी व्हा. उच्च न्यायालयाने देखील बदलापूरच्या घटनेची दखल घेतली आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी चांगलेच सुनावले. मुख्यमंत्री उद्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जाऊ शकतात, कारण त्यांना बहिणी या मतदानासाठी पाहिजे आहे. बहिणीची किंमत मतदानासाठी आहे. आमच्याकडे बहिणीची किंमत नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला जर वाटत असेल, तर माझ्या बहिणींची मतं विकत घेऊ शकतात, पण माझ्या बहिणी एवढ्या विकाऊ नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img