23.1 C
New York

Sharad Pawar : ‘ते’ वक्तव्य योग्य नाहीच; शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

Published:

बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या (Badlapur Crime) निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली (Maharashtra Bandh) आहे. उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन करण्यात आलं आह. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनीही (Sharad Pawar) बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shidne) वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. बदलापुरातील आंदोलन राजकीय होतं असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी असं बोलणं योग्य नव्हतं असे पवार म्हणाले.

बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे स्टेशन आणि संबंधित शाळेच्या परिसरात आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बदलापुरातील स्थानिकांपेक्षा बाहेरचीच लोकं जास्त होती असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन

त्यांच्या याच वक्तव्यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. बदलापुरची घटना हे सरकारचं अपयश आहे. शैक्षणिक संस्थांत असे प्रकार धक्कादायक आहेत. या घटनेचं लोण राज्यात पसरलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे. संघर्षाच्या भूमिकेऐवजी आम्ही बंदचा पर्याय निवडला. प्रत्येक घटकाने या बंदमध्ये शांततेत सहभागी व्हावं. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्या बंद आहे. कुणीही या घटनेचं राजकारण करू नये. आंदोलन राजकीय होतं असं सत्ताधाऱ्यांकडून बोललं गेलं ते योग्य नाही. कुणीही या मुद्द्याचं राजकारण केलेलं नाही. उद्याच्या बंद पाठीमागे आमचा कोणताच राजकीय हेतू नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar आम्ही कुणाला प्रोजेक्ट करणार नाही

महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी सातत्याने होतेय. काँग्रेस नेते मात्र या मागणीला अनुकूल नाहीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, आमच्यात कुणालाच इंटरेस्ट नाही. कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त सत्ता परिवर्तनाचं ध्येय. राज्यातील सत्तेत बदल घडवून लोकांना पर्याय कसा देता येईल यावर लक्ष केंद्रीत करू या. या मुद्द्याची (मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार) आता काहीच गरज नाही. मी ही मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्नच नाही, असे शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img