26.6 C
New York

Raj Thackeray : भाषण थांबून आकाशात बघत राज ठाकरे म्हणाले, …हा उतरेल ना व्यवस्थित?

Published:

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून सध्या ते विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेत आहेत. सोलापूरमधून सुरु केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरेंनी 2 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांच्याकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा होत असून आत्तापर्यंत 7 मतदारसंघांत त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत आज यवतमाळ येथील वणीमध्ये मनसेचा मेळावा होता. मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेचं शक्तीप्रदर्शन या मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे बोलत असताना करण्यात येत होतं. त्याचवेळी, पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राज ठाकरेंनी भाषण केलं, त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालंय

कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंचं भाषण म्हणजे पर्वणीच असते. राज ठाकरेंनी छोटे खानी आज विदर्भ दौऱ्यात वणी येथे भाषण केलं,मनसेच्या (MNS) झेंड्याद्वारे अवकाशात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून अभिवादन केले जात होते. राज यांचं भाषण नेमकं सुरू असतानाच, पॅराग्लायडिंग गिरट्या त्यांच्या डोक्यावर हे घालत होते, तेव्हा राज यांनी अरे थांबव रे बाबा.. असे म्हणत ते थांबवायला सांगितले. त्याच्या गिरट्या मात्र, तरीही सुरूच होते, राज ठाकरेंच्या भाषणाला पॅराग्लायडिंगचा तो आवाज बाधक ठरत होता. तेव्हा, राज ठाकरेंनी 2-3 वाक्य उच्चारली अन् एकच हशा पिकला. राज ठाकरे म्हणाले, हा उतरेल ना व्यवस्थित?, इथं नाही ना येणार?. नाहीतर साहेब चुकलो, साहेब चुकलो म्हणून इकडेच यायचा, असे राज यांनी म्हटले, त्यावर मनसैनिकांनी हसून दाद दिली.

‘ते’ वक्तव्य योग्य नाहीच; शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

Raj Thackeray पोलिसांवर राज्यकर्त्यांचा दबाव

बदलापूर बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेचा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात संदर्भ देत, राजरोस अशा घटना राज्यात घडत आहेत. राज्यात कायद्याचा वचक उरलेला नाही त्यामागील मुख्य कारण आहे असं म्हणाले. या सर्व प्रकरणात पोलिसांचा अजिबात दोष नाही. त्यांच्यावर जो वरच्या राज्यकर्त्यांचा दबाव असतो, त्या दबावामुळे त्यांना तसं वागावं लागतं. कारण पोलिसांनी कुठल्या गोष्टी करायला घेतल्या तर पोलिसांचं निलंबन होतं. पोलिसांमागे चौकशा आणि निलंबनाच्या कारवाई केली जाते. मात्र, जे लोक सत्तेत बसले आहे त्यांच्या कधीही चौकशा केल्या जात नाहीत. कुठली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांच्या हातात आज काहीही नाही. मात्र दोष द्यायची वेळ आलीच तर त्यांना जबाबदार धरलं जाते, असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पोलिसांची बाजू मांडली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img