3.6 C
New York

Mumbai High Court : महाराष्ट्र बंदपूर्वी ‘मविआ’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

Published:

बदलापूर् येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून उद्या (दि.24) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला दणका दिला आहे. कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. त्यावर कोर्टाने बंदला परवानगी नाकारली आहे .मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसून जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

Mumbai High Court ‘महाराष्ट्र बंद’ विकृती विरुद्ध संस्कृती – ठाकरे

उद्याचा महाराष्ट्र बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये. (Uddhav Thackeray) उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या बंदसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ते दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाषण थांबून आकाशात बघत राज ठाकरे म्हणाले, …हा उतरेल ना व्यवस्थित?

Mumbai High Court पुण्यात मोर्च्याचे आयोजन

बदलापूर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर… आदी ठिकाणांवर महिला आणि मुलींवर अत्याचारांच्या घटनांचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तर्फे लाल महाल येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करून लाल महाल ते अलका चौक मोर्चा काढण्यात येणार आहे. संवेदना जिवंत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, आपल्या परिसरातील सर्व दुकानदारांना व व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता लाल महाल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img