26.6 C
New York

MNS : यवतमाळच्या वणी शहरात मनसेची ‘राज’ गर्जना; चंद्रपूर पाठोपाठ वणी विधानसभेचाही उमेदवार ठरला

Published:

यवतमाळ

एकदा या राज ठाकरेच्या (Raj Thackeray) हातात एकदा राज्याची सत्ता द्या. राज्य कसं चालवलं जातं? कायद्याची भीती काय असते हे मी दाखवून देईन. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. कोणती घटना घडली तर मी पोलिसांना 48 तास देईन. त्यांना सांगिन 48 तासांत तपास लागला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्र सुधरून ठेवतील असा विश्वास आहे, असं मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितल आहे.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यात वर्षाच्या शेवटी निवडणुका होतील. यासाठी मी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तसेच यातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी हा दौरा आखला आहे. या निवडणुकीत आपण 200 च्या वर उमेदवार उभे करणार आहोत, असं राज ठाकरे म्हणाले आहे. ते आज यवतमाळमधील वणीमध्ये होते. इथे त्यांनी मनसेचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर त्यांना जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, बदलापूर घटनेचा दोष मी पोलीस यंत्रणेला अजिबात देणार नाही. त्यांना असं वागावं लागतं कारण त्यांच्यावर सरकारी दबाव असतो. या दबावामुळे त्यांना असं वागावं लागतं. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचे निलंबन करतात. त्यांच्यावर चौकशी लावतात. मात्र सरकारमध्ये बसलेल्यांच्या चौकशी लावत नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी लाठीचार्ज केल्यास पुन्हा पोलिसांनाच दोष देतात, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यात सध्या राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. हे असं वातावरण मी याआधी पाहिलं नाही. सध्या कोण कोणत्या पक्षात हे समजत नाही. याचा राग तुम्हाला येतो की नाही? येत असेल तर हा राग व्यक्त करण्यासाठी योग्य जागा येणार विधानसभा आहे. मात्र तुम्ही असंच राहिलात तर तुमच्या नशिबात अशीच माणसं येणार. असंच सरकार येणार. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, बदलापुरातील घटना आमच्या मनसे पदाधिकारी महिलेने ती घटना समोर आणली. तेव्हा ही गोष्ट कळली. तोपर्यंत ही घटना दाबून ठेवली होती. त्यानंतर अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनेतील आरोपींचे हातपाय कापून चौकोन केले पाहिजे. कायद्याचे वचक नसल्याने अशा घटना घडत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img