26.6 C
New York

Raj Thackeray : चौरंगी शिक्षा अन् कायद्याची भीती, नक्की काय म्हणाले राज ठाकरे

Published:

एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, राज्य कसं चालवले जाते आणि कायद्याची भीती काय असते हे मी तुम्हाला दाखवून देईल पुन्हा कोणत्याही महिलेकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बदलापूर घटनेवर गर्जना केलीयं. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे विविध मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करीत आहेत. यवतमाळ दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, बदलापूर येथील अत्याचाराची घटना मनसेच्या महिला सेनेने बाहेर आणली आहे. तोपर्यंत ही घटना दाबून ठेवली होती. घटना घडल्यानंतर लगेच इतर ठिकाणी आंदोलन सुरु झाले. नराधम लहान-लहान मुलींवर बलात्कार करत आहेत, याचे कारण म्हणजे कायद्याचा वचक नसणे, याचा दोष पोलीस यंत्रणेला देणार नाही त्यांच्यावरील सरकारी दबावामुळे त्यांना असे वागावे लागत आहे. मी सहज बोलत नाही अतिशय गांभीर्याने बोलतोयं, की एकदा या राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, राज्य कसं चालवले जाते आणि कायद्याची भीती काय असते हे मी तुम्हाला दाखवून देईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

‘ते’ वक्तव्य योग्य नाहीच; शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

तसेच विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील पण मी अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. आज वणी विधानसभेसाठी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करत आहे. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकर यांच्या मागे उभे रहावे आणि त्यांना आमदार करावे. मी कसे प्रश्न सोडवतो माहीत आहे, आधी हात जोडून जातो आणि मग कोणी ऐकले नाही तर हात सोडून जातो, या शब्दांत राज ठाकरे कडाडले आहेत. दरम्यान, विधानसभेमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार पक्षातर्फे उभे करणार आहोत. महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले असून आजपर्यंत मी असे वातावरण महाराष्ट्रात पाहिले नव्हते. सध्या कोण कुठच्या पक्षात आहे हेच समजत नाही आहे, अशा गोष्टींचा राग व्यक्त करण्याची जागा ही येणारी विधानसभा असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img