9.6 C
New York

Ajit Pawar : निवडणूकीच्या तोंडावर दादांचे आमदार दादांची गेम करणार?

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडे (Ajit Pawar) अनेकांचं लक्ष आहे. पक्षफुटीनंतर त्यांच्यावर मोठी जबाबदार आहे. आपल्या गटाचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी ते टोकाचा संघर्ष करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणूकांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पवार गटाने लोकसभेच्या १० जागा लढवून ८ जागा जिंकल्या. दादा गटाच्या आमदारांना यामुळं परतीचे वेध लागल्याचं चित्र निर्माण झालंय. विधानसभेच्या तोंडावर दादांसोबत मोठी गेम होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय.

वर्षभरापुर्वी काकांशी बंडखोरी करत अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली. त्यांच्यासोबत ४० आमदारांनी पवारांची साथ सोडली होती. पवार गटाने शिवस्वराज्य यात्रेला विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरुवात केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दादा गटाच्या आमदारांची यामुळे अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र आहे. दादांचे आमदार शरद पवारांना सोडून परतणार का? या प्रश्नांवरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापलंय. याचं कारण ठरतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचे विधान आहे. शिंगणे यांनी शरद पवारांची साथ कधीच सोडली नाही, मात्र मजबुरीमुळे दादांसोबत गेल्याचं शिंगणे यांनी म्हटलं आहे. शरद पवार आजही आपले नेते असल्याचे शिंगणे यांनी सांगितलं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील राजकारण तापले असतानाच दुसरीकडे अजित पवारांची साथ किती आमदार सोडणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. राजेंद्र शिंगणे हे पाच वेळा आमदार आहेत. ते चार वेळा मंत्रीही राहिले आहेत.

राज्यातील पोलिसांच्या संख्येत वाढ

अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या गेल्या वर्षी जुलैच्या सुरुवातीला विरोधात बंड केले. अविभक्त राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ४० आमदारांना गळाला लावलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी दादा गटाचे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्याशी हातमिळवणी केली होती. शरद पवार यांच्या छावणीतील राष्ट्रवादीकडून लढून ते अहमदनगरमधून खासदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे आठ खासदार विजयी झाले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला चारपैकी फक्त १ जागा जिंकता आली. बारामतीत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी ज्या प्रकारे शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्रात मोठानिवडणूकीच्या तोंडावर दादांचे आमदार दादांची गेम करणार?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img