दोन चिमुकल्या मुली आणि शाळेचा शिपाई, या शिपायाने मुलींसोबत कूकर्म केल्याच्या घटनेनंतर (Badlapur Rape Case) राज्यभरात संतापाची लाट उसळलीयं. शाळेच्या मालमत्तेची तोडफोड ते बदलापूर रेल्वे स्थानकावर संतप्त नागरिकांनी चक्काजाम केला. तर विविध स्तरातील नागरिकांकडून घटनेचा निषेध होतोयं. या घटनेनंतर अभिनेते रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी शिवरायांच्या काळातल्या ‘चौरंग’ (Chourang Punishment) शिक्षेचा दाखला दिलायं. शिवरायांच्या काळात कोणत्याही महिलेकडे कोणीही वाईट नजरेने पाहू नये, म्हणून चौरंग शिक्षा दिली जायची…आता बदलापूर घटनेनंतर चर्चा सुरु आहे ती फक्त चौरंग शिक्षेची…ही चौरंग शिक्षा काय होती? त्या काळात कोण या शिक्षेला बळी पडलंय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
राज्यकारभार चालवत असताना शासनव्यवस्थेची आदर्श घडी असली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिवरायांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. स्त्री स्वराज्यातील असो किंवा शत्रूच्या गटातील तिचा आदर ठेवला पाहिजे, सन्मानाने वागवले पाहिजे, त्यासाठी शिवरायांनी चौरंग शिक्षेची तरतूद केली होती. शिवरायांनी या शिक्षेचं धनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या अनेक नराधमांना केलं. मग यामध्ये खुद्द शिवरायांच्या मेहुण्यासाही बक्ष केलं नाही.
इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या माहितीनूसार, रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर याने एका महिलेवर बलात्कार केला. राजदरबारात प्रकरण सुरु होतं, त्यावेळी शिवरायांनी बाबाजी भिकाजी गुजर याचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली. याच शिक्षेला चौरंग शिक्षा असं म्हटलं जातं. हात-पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्रावामुळे व्यक्ती दगावू नये, म्हणून जखमा गरम तेलात किंवा तुपात तळल्या जायच्या. असं कृत्य महिलांबाबत करण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये, चौरंग शिक्षा यासाठी दिली जात असायची. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली.
संबंधित व्यक्तीचे हात -पाय कलम केल्यानंतर जखम तेलात तळल्या जायच्या, असं केल्याने नसा बंद व्हायच्या रक्तस्त्राव थांबायचा पण व्यक्ती मरत नसायचा. चौरंग ही शिक्षा म्हणजे फक्त हात-पाय तोडायची, त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही. कारण आयुष्यभर हे उदाहरण म्हणून राहील. तुम्ही जर महिलांवर अत्याचार केला, तर तुम्हालाही अशीच शिक्षा होईल, असे सर्वांसमोर उदाहरण राहावे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरु केली होती. गुजर व्यतिरिक्त आणखी एका प्रकरणाबाबत सावंत यांनी भाष्य केलंय. ते म्हणजे खंडोजी कोपर यांचा एक हात आणि पाय तोडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढंच काय तर महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या मेहुण्यालाही सोडलं नव्हतं. त्यांनी मेहुण्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले होते.
Chourang Punishment छत्रपतींनी मेहुण्यालाही सोडलं नाही
धारवाडजवळील बेलवडी जिंकण्यासाठी शिवरायांचा मेहुणा सखुजी गायकवाड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. पतीच्या मृत्यू पावल्यावर मल्लवा यांनी ही लढाई सुरुच ठेवली. त्यांनी पुरुष वेशाधारी स्त्री सेन्य मैदानात उतरवलं. महाराज मैदानात उतल्यानंतर बेलवडीच्या सैन्यांनी माघार घेतली. तर सुखोजी गायकवाड याने काही सैन्यांना कैद करुन मराठा छावणीतमध्ये ठेवलं. यामध्ये मल्लवाचाही समावेश होता. सखूजी यांनी मल्लवा यांच्यावर वाईट नजर ठेवल्याचं शिवरायांना समजताच सुखोजीला त्याचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. हा सुखाजी शिवरायांचा मेहुणा होता. तर मल्लवा यांना सावित्रीचा किताब देऊन सन्मानाने राज्य परत करत गौरव केला.