मुंबई
मुंबईच्या विक्रोळी येथील ईस्टर्न एक्स्प्रेस (Vikhroli Accident) हायवेवर एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने फुटपाथवरील झाडाला गाडी जोरदार धडकली व काही अंतरावर जाऊन पलटी झाली. यात दोन जण ठार झाले असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटणात बुधवारी रात्री 12:30च्या सुमारास घडली.
विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी कार झाडाला धडकत पलटी झाल्याने चालक सिद्धार्थ ढगे व त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.