28.9 C
New York

MPSC : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Published:

राज्यसेवा आणि आयबीपीएस या परीक्षांची तारीख एकाच दिवशी आल्याने ही तारीख बदलावी यासाठी विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आता या आंदोलनाला अखेर यश आले असून, MPSC तर्फे 25 ऑगस्टरोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

MPSC …तर मोठं आंदोलन केले जाईल रोहित पवारांचा इशारा

25 तारखेची परीक्षा पुढे ढकलली मात्र ऑक्टोबर पर्यंत या परीक्षेची तारीख यावी, असे मत आंदोलनामध्ये सहभागी झालेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. सोबतच कम्बाईन परीक्षेचे नोटिफिकेशन देखील आगामी नऊ ते दहा दिवसांमध्ये यावं अशी मागणी तसेच नोटिफिकेशन आले नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारलं

MPSC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थी आंदोलनावर ठाम

एकीकडे 25 ऑगस्ट रोजी होणारी MPSC ची परीक्षा जरी पुढे ढकलण्यात आली असली त्यानंतरदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी जाहीर केलं आहे.

MPSC शरद पवारांनी दिले होते आंदोलनात उतरण्याचा इशार

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु, सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचा इशारा पवारांनी दिला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img