28.9 C
New York

MPSC Exam : विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश! MPSCची परीक्षा पुढे ढकलली

Published:

पुणे

राज्यसेवा आणि आयबीपीएस या परीक्षांची तारीख एकाच दिवशी आल्याने ही तारीख बदलावी यासाठी विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आता या आंदोलनाला अखेर यश आले असून, MPSC तर्फे 25 ऑगस्टरोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा (MPSC Exam) संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली असून नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीने याबाबत अधिकृत ट्वीट केले आहे. या निर्णयानंतर पुण्यामधील विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img