शंकर जाधव, डोंबिवली
सण – उत्सव साजरा करताना सामाजिक संदेश दिल्याने जनजागृती होत असते. महिल सक्षमीकरण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. डोंबिवलीतही दहीहंडी उत्सवात (Dahi Handi) ‘महिला सुरक्षा’ वर जनजागृती करण्यासाठी स्वराज्य दहीकाला महोत्सवात ‘महिला सुरक्षा हंडी’ लावली जाणार असून ही हंडी महिला गोविंदा पथक फोडणार आहेत अशी माहिती युवा सेना सचिव तथा दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) फाऊंडेशनचे सर्व्हेसर्वा दीपेश म्हात्रे यांनी गुरुवार 22 तारखेला पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत आशुतोष सिंग, परेश म्हात्रे, विपुल म्हात्रे, युवराज पाटील, स्वप्नील विटकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दीपेश म्हात्रे म्हणाले, दीपेश म्हात्रे फाउंडेशन प्रस्तुत स्वराज्य दहीकाला महोत्सव 2024 अंतर्गत सोमवारी श्रीकृष्ण जन्म सोहळा होणार असून मंगळवारी दहीकाला उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे डोंबिवलीत उपस्थित राहणार आहे. गुरुवर्य स्व. धर्मवीर आनंद दिघे यांची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा वारसा सुरू ठेवत प्रतिवर्षी दीपेश म्हात्रे फाउंडेशन माध्यमातून स्वराज्य दहीकाला महोत्सव आयोजित करण्यात येतो. मंगळवार 27 तारखेला पश्चिमेकडील सम्राट चौक येथे साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवात पहिली रस्त्यावर मॅटिक अस्फाल्ट टाकण्यात येणार असल्याने गोविंदाना कोणतीही इजा होणार नाही. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षाचालकांना देणार असल्याचे सांगितले. यावर्षीही लाखो रुपयांची बक्षिसे असल्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील गोविंदा पथके या हंडीला सलामी देण्यासाठी येतील. या उत्सवात महिलांसाठीहि दहीहंडी लावण्यात येणार आहे. यावर्षीचे खास आकर्षक म्हणजे भगवान नरसिंह आणि गुलाबी साडी फेम सुप्रसिद्ध गायक संजू राठोड उपस्थित राहणार आहे. या उत्सवात सकाळपासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केले आहे.
रस्ता रुंदीकरण होत नाही तोवर रस्त्यांवर कोणीही कमानी लावू नये असे विनंती पत्र युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी विविध राजकीय पक्षाच्या कार्यालयाला दिले आहें अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.