-3.8 C
New York

Marathi Actor : …पण मग वेळेत पैसे का देता येत नाही? मराठी अभिनेता भडकला

Published:

आशय कुलकर्णी हा मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Actor) लोकप्रिय अभिनेता आहे. आशयने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आशय हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो आणि त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. आशय त्याच्या नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतो. पण, आशयने एक नुकतंच संतप्त पोस्ट शेअर केली आहे. आशयला त्याच्या कामाचे पैसे मालिकेत काम करूनही अद्याप मिळालेले नाहीत. याबाबत पोस्टमधून त्याने संताप व्यक्त केला आहे. “शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते मग पैसे वेळेत देता येत नाहीत का?” असा सवाल त्याने या पोस्टमधून केला आहे.

Marathi Actor आशय कुलकर्णी काय म्हणाला?

मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शो चे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शोचे EP यांना वारंवार फोन केले, मेसेजे केले, ईमेल केले…तरी पैसे मिळत नाहीयेत. रोज शूटला येण्याची अपेक्षा आमच्याकडून असते तेही वेळेत…पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?

तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयचा अभिनयाला रामराम अन्…

आशयने त्याच्या पोस्टमध्ये कोणत्याही मालिकेचं नाव घेतलेलं नाही. त्याचा रोख त्यामुळे नेमका कुणाकडे आहे, हे कळू शकलेलं नाही. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तो घराघरात ‘माझा होशील ना’, ‘पाहिले न मी तुला’ या मालिकांमुळे पोहोचला. ‘मुरांबा’, ‘सुंदरी’ या मालिकांमध्येही तो दिसला होता. सध्या तो ‘सुख कळले’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हिक्टोरिया या सिनेमातही आशयने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img