Big Boss Marathi:‘बिग बॉस मराठी 5’ हा शो सध्या खूप गाजत असून सध्या चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकर हिने पंढरीनाथ कांबळे यांच्याशी वाढ घालून त्यांच्या करिअरवरून टिप्पणी केली. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करत आहे’ असं म्हणत तिने पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळी यांची खिल्ली उडवली. तिच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण तापलं असून सदस्यांना हे बोलणं आवडलेल नाही. हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील तीच घरातील इतर सदस्यांना बोललेल हे वक्तव्य आवडलं नाहीय. यावर सोशल मीडियावरही चांगलाच वाद रंगला असून, पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी, तसेच सिद्धार्थ जाधव यांसह अनेक कलाकारांनी तिच्या या वक्तव्याबद्दल जान्हवीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
हे प्रकरण सध्या खूप तापलं असून, सध्या सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. त्यांनतर तिने (Big Boss)बिग बॉस च्या घरात रडून (Pandharinath Kambli) पंढरीनाथ कांबळी यांची त्यांनी माफी मागितली आहे. मात्र, तिची हि माफी नसून ती केवळ नाटक करत आहे, असं कलाकारांनी सांगितलंय. (Vishakha Subhedar) विशाखा सुभेदार यांनी देखील यापूर्वी पॅडी याना सपोर्ट करणारी पोस्ट लिहली होती. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या माफीनंतर विशाखा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जान्हवीला खडेबोल सुनावले आहेत. तो बापा माणूस आहे… !असं म्हणत पॅडीच विशाखाने कौतुक केलय.
विशाखा सुभेदार यांची पोस्ट काय ?
माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो… पण मनाचा मोठेपणा मात्र दाखवलायं. Its ok.म्हणजे फक्त ठीक आहे असं म्हणालाय… तो ऍक्टर आहे, आम्ही असं रोज भाव भावनेचं ओझं घेऊन फिरत असतो. कारण तोच आमचा धंदा आहे…! त्या माणसाला खरे खोटे अश्रू समजले नसतील?पण तरीही तोच तुझ्या या खोट्या अश्रूंना its ok म्हणाला… खरंच ग तोच बाप माणूस आहे… ! त्याने तो विषय सोडूनही दिला असेल पण तरीही तू तुझ्या जिभेला यावर घाल. . More power to Paddy Kamble. aplapaddy #संयमकायम #actor असे हॅशटॅगही त्यांनी पोस्ट मध्ये वापरलेले आहेत.
देशात लवकरच जनगणना केली जाणार ?
अनेक कलाकारांचा पॅडी यांना पाठिंबा
पॅडीसारख्या ज्येष्ठ कलाकाराबद्दल जान्हवीने केलेलं वक्तव्य, आणि तिने त्याची उडवलेली खिल्ली बहुतेक जणांना खुपली. या नंतर अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी जान्हवीवर टीका देखील केली. ‘ओव्हरअक्टिंग’हा शब्द तुझ्या तोंडून निघणं खरंतर खूप हास्यास्पद आहे. घरात सुरु असलेल्या गेम बदल तू वाटेल ते बोलू शकते, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करण्यासाठी, विशेषतः वर्षा उसगांवकर आणि बाबाच्या करिअरवर बोलण्याआधी तुला मराठी इंडस्ट्रीत तुला आधी स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल. असं पॅडी यांच्या मुलीने जान्हवीला सुनावलं.
एक गोष्ट कायम लक्षात ठेव.. जुनं तेच सोनं.. आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणारा आहे’,अश्या भाषेत सिद्धार्थने जान्हवीला सुनावलं होतं.