बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर (Badlapur Rape Case) येत असतानाच आता अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे आता बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Minor Girls Rape Case) प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, आपल्या मुलाला या सर्व प्रकरणात मुदाम अडकवण्यात आल्याचंही अक्षयच्या वडिलांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी वरील दावे केले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाला कसे वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Badlapur Minor Girls Rape Case Akshay Shinde Family Members Shocking Claims)
Badlapur Rape Case अक्षयच्या पालकांचे दावे काय?
मुलींसोबत जे काही अक्षय शिंदे याने केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर, अक्षय हा शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा. बाकी त्याच्याकडे कोणतेही काम नव्हतं, असे अक्षयच्या आईने म्हटले आहे. अक्षयची तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी असल्याचाही दावा अक्षयच्या वडिलांनी केला आहे.
Badlapur Rape Case अक्षय शिंदे गतीमंद आईने सांगितले सत्य
पुढे अक्षयच्या आईला तो गतीमंद होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असे सांगितले. मात्र, त्याला छातीत दुखण्याचा त्रास होता तसेच तो डोक्याने कमजोर असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्याला काही औषधेदेखील सुरू होत्या असे अक्षयच्या आईने सांगितले. आमचं कुटुंब हाऊसकिपिंगचं काम करायचं. आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचे कामही करायचो. आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आत जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो, अशी माहिती अक्षयच्या आईने दिली.
बदलापुरातील आंदोलनानंतर तब्बल 1500 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Badlapur Rape Case चौकशीसाठी SIT स्थापन
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईला (Maharashtra) सुरुवात केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.
Badlapur Rape Case 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
बदलापूरच्या घटनेच्या विरोधात मविआकडून येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील. हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचा आरोपही पटोलेंनी केला आहे.