-4.5 C
New York

Akola Crime : ‘लाडक्या बहिणीं’च्या लेकीने किती छळ सोसायचा? दानवेंचा सरकारला प्रश्न?

Published:

उमेश पठाडे, छत्रपती संभाजीनगर

एकीकडे बदलापूरमधील (Badlapur Crime) घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच दुसरीकडे अकोल्यामधून (Akola Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नराधम शिक्षकाने तब्बल 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे
कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि खून प्रकरणी देशभरात जनआक्रोश होत असतानाच, बदलापूरमध्ये अवघ्या 3.5 ते 4 वर्षांच्या दोन चिमुरडींवरील अत्याचार समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच, अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथे एका शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील या शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या नराधम शिक्षकाचे नाव प्रमोद सरदार असून मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img