Aho Vikramrka: अहो विक्रमार्का’ चा खतरनाक टीझर प्रदर्शित प्रदर्शित ….. बॉक्स ऑफिसवर सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा आहे. हे चित्रपट आता हिंदी चित्रपटावर देखील वरचढ चढत आहेत. अनेक मराठी कलाकार आता हिंदी चित्रपटात देखील काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मराठी अभिनेत्यांनी थेट दाक्षिणात्य चित्रपटात देखील उडी घेतली आहे. काल नुकताच ‘अहो विक्रमार्का(Aho vikrmarka) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चाहत्यांचा अफलातून प्रतिसाद या टीझर ला पहायला मिळाला. या मध्ये अभिनेते प्रवीण तरडे या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. तसंच या मध्ये तेजस्विनी पंडित आता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अभिनेत्री (Tejaswini Pandit)तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.त्यामुळे प्रत्येक भूमिकेत आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आता अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते (Pravin Tarde)प्रवीण तरडे त्यांच्या अभिनयाबरोबरच बेधडक व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखले जातात. ‘धर्मवीर’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी अभिनयाचीही छाप पाडली. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी ते तयार झाले आहेत. या सिनेमातील त्यांचा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आलाय.या चित्रपटात काम केल्यावर तेजस्विनी आपल्या भूमिकेबद्दल असं सांगते की,नवीण प्रोजेक्टमध्ये काम करण कलाकारांसाठी एक वेगळं आव्हान असत. त्यात आपली मातृभाषा नसलेल्या चित्रपटात काम करताना आव्हान थोडं कठीण असत.केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं.तस पाहता साऊथचे सर्व कलाकार शिस्तप्रिय आहेत.
तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयचा अभिनयाला रामराम अन्…
या चित्रपटात वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा ती साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपट अनेक मराठी कलाकार हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ६ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.