16.1 C
New York

Ambarnath Crime : बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Published:

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजं (Ambarnath Crime) असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जुलै ते ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीत आरोपी संतोष कांबळे पीडित मुलीबरोबर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करत होता. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

उज्ज्वल निकम यांची बदलापूर केस मधील नियुक्ती रद्द करा, वंचितची मागणी

पोलिसांनी सांगितले, आरोपी संतोष कांबळे हा अंबरनाथ पश्चिमेतील भास्कर काॅलनीत राहतो. या वसाहतीसाठी संतोष कांबळे यांच्या घराच्या परिसरात अंबरनाथ पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. नैसर्गिक विधीसाठी नागरिक या शौचालयाचा वापर करतात. पीडित मुलगी सार्वजनिक स्वच्छता गृहात नैसर्गिक विधीसाठी आली की आरोपी संतोष तेथे यायचा. तेथे कोणी नाही पाहून तिच्याशी जवळीक साधून तिला स्वताच्या मोबाईलमधील अश्लील दृश्यचित्रफिती दाखवायचा. तेथे तिच्या बरोबर अश्लील चाळे करायचा. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. या प्रकाराने अल्पवयीन मुलगी भीतीच्या सावटाखाली असायची.गेल्या मंगळवारी दुपारी आरोपी संतोषने पीडित मुलगी स्वच्छतागृहात येताच तिच्या बरोबर नेहमीप्रमाणे अश्लील चाळे केले. संतोष कडूनचा त्रास वाढू लागल्याने पीडित मुलीने घडला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. हा प्रकार ऐकून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img