23.1 C
New York

Badlapur : बदलापुरातील आज स्थिती काय?

Published:

बदलापुरातील (Badlapur)  नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यामुळे पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.

आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज इंटरनेट बंदच ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे रोको, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Badlapur School Case : राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Badlapur  रेल्वे सेवा सुरळीत

बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर या शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचारांनंतर नागरिकांनी 11 तास रेल रोको आंदोलन केलं. काल संध्याकाळी सहा वाजता रेल्वे ट्रॅकवरून न हटणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मग जमावानेदेखील दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. मग संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे सेवा सुरु झाली. आज परिस्थिती पूर्ववत होत आहे. सकाळपासून रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.

Badlapur  उज्वल निकम खटला चालवणार

बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.13 तारखेला बदलापूरमधील एकाच शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्या. त्यानंतर बदलापूरमध्ये रेलरोको आणि तोडफोड करत स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. नागरिकांचं आंदोलन पाहता दीपक केसरकर गिरीश महाजन यांनी काल ही केस फास्टट्रॅकवर चालवणार आहे. या केसवर काम करणार असल्याचं उज्वल निकम काल सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img