3.8 C
New York

Badlapur School Case : राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Published:

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा (Badlapur School Case) पुढील तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक आरती सिंह (Aarti Singh) ,विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), गठीत करण्यात येत असल्याची माहिती छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांनी दिली आहे.

या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 65(2),74,75,76 सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरती सिंह,विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. राज्य सरकारने या प्रकरणात कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

…म्हणून मी काँग्रेसचा गमचा घातला; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं!

या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आज (20 ऑगस्ट) सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर (Badlapur Railway Station) हजारो आंदोलक आंदोलन करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सायंकाळी 6 च्या सुमारास लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांनी हे आंदोलन मागे घ्यावा यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रयत्न केले होता मात्र त्यांना यश आले नाही.

Badlapur School Case नेमकं काय घडलं?

अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात बदलापूरमध्ये (Badlapur Case) अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पालक आणि बदलापूरमधील नागरिक हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड संतापले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img