9.5 C
New York

Siddharth Chandekar : बदलापूर अत्याचार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

Published:

कोलकात्यातील डॉक्टर तरूणीवरील अन्यायाची घटना ताजी असतानाच. बदलापूरमध्ये साडे चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचं समोर आलं. या मुलींवर शाळेतील शौचालयातील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यानंतर बदलापूरकरांनी त्या मुलींसाठी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. या घटनेचे आता सर्वत्र पडसाद उमटत आहेत. या घटनेचा निषेध कलाक्षेत्रातूनही केला जात आहे. या घटनेवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यानेही प्रतिक्रिया दिली. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

Siddharth Chandekar सिद्धार्थ काय म्हणाला?

बदलापूरमधील चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत इन्स्टाग्रामवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने स्टोरी शेअर केलीय. मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे आता बोला, तुमच्याकडे म्हणजे कुणी वाईट नजरेने बघणार नाही… त्या लहान पोरींना तर संस्कृती या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. 3- 4 वर्षांच्या स्कूल युनिफॉर्ममधल्या मुली आहेत त्या! ही विकृती आहे या चिमुकल्या जीवांवर अत्याचार करणं. या विकृत पुरुषांना ‘मानवी हक्क’ नसावेत! कसलाही अधिकार नसावा! जगण्याचाही!, अशी पोस्ट सिद्धार्थने इन्टाग्रामवर शेअर केलीय.

बदलापूर अत्याचारप्रकरणी मोठी बातमी, आरोपी अक्षय शिंदेला…

कोलकात्यातील बलात्कार प्रकरणावरही सिद्धार्थ चांदेकरने एक व्हीडिओ शेअर केला होता. यात त्याने मुलांवर संस्कारांची गरज असल्याचं म्हटलं होतं. मला वाटतं ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’हे आपण आता बोलायला नको. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परय येतेय की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे.. हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली, असं सिद्धार्थ म्हणाला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img