19.7 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्याची झेड प्लस सुरक्षा शरद पवार यांना आहे. मात्र केंद्राची देखील झेड प्लस (Z Plus Security) सुरक्षा देण्यात आली आहे.

शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. आजपासून सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे. नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आलं. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img