23.1 C
New York

SDM Lathi Charge : पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावर लाठीचार्ज व्हिडिओ व्हायरल

Published:

पाटणा

बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Rape Case) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रसह देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या घटनेविरोधात काल बदलापूरमध्ये पालकांनी तीव्र रेल रोको आंदोलन केलं होतं. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या घटना अनेकदा ऐकल्या आणि पाहिलेले आहे. अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे. बिहारमध्ये आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या वेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. मात्र यावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज (SDM Lathi Charge) करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहेत.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, या भारत बंदमध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस व इतर पोलिस फोर्स रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, यावेळी, पोलीस फोर्समधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. देशातील उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यात आज भारत बंदचे पडसाद उमटले आहेत. दलित संघटनांनी रस्त्यावर उतरत भारत बंदसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img