7.3 C
New York

Sanjay Raut : बदलापूर घटनेवरून राऊत न्यायलयावर संतापले

Published:

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. (Sanjay Raut) या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. जर ती दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असत तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ त्या शाळेच्या पायऱ्यावर फतकल मारून बसले असते. आता ते का गेले नाहीत? असा रोखठोक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ही घटना बदलापूरच्या ज्या शाळेत घडली ती शाळा भाजपशी संबंधित आहे. जर ती दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असत तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ त्या शाळेच्या पायऱ्यावर फतकल मारून बसले असतं. असंही राऊत यावेळी म्हणाले.

गिरीष महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचेच हस्तक आहेत ज्यांनी 200 बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाची पाठ थोपाटली आणि त्यांचा प्रचारही केला असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार घणाघात केला आहे. महाराष्ट्राची आब्रू तुम्ही लोकांनी घातली असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. महाराष्ट्रात घटना आणि अघोरी सरकार आहे. माणुसकी किंवा भावना त्यांच्याकडे असतील या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

बदलापूर अत्याचारप्रकरणी मोठी बातमी, आरोपी अक्षय शिंदेला…

Sanjay Raut सर्वोच्च न्यायालयाने सर्वसमभाव काम करावं

कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली मग महाराष्ट्रात बदलापूर येथे जे घडल त्याची दखल का घेत नाही? असा थेट प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांनी सर्वोच्च न्ययालयावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वेच्च न्यायालयाने कोलकाता येधील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली काणर तेथे ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. महाराष्ट्रत मात्र बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला त्याची दखल न्यायालय घेत नाही असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img