23.1 C
New York

Otur Crime : वाटखळे येथील शेतजमीनीच्या वादामधुन चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन खुन

Published:

रमेश तांबे, ओतूर

वाटखळे ता.जुन्नर येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादामधुन चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन खुन झाला असून, खुन करणाऱ्या दोन आरोपींना ओतूर (Otur Crime) पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली. निखील संदिप घोलप रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे असे खुन झालेल्या तरूणाचे नाव असून, या खूनाबाबत अभिषेक प्रकाश घोलप, जितेंद्र पांडुरंग घोलप या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगा निखील संदिप घोलप हा एक ऑगस्ट पासून वाटखळे येथून हरवला असल्याची तक्रार त्याचे वडिल संदिप खंडु घोलप यांनी ओतूर पोलीसात दिली होती.सदर मिसींगचा तपास पोलीस हवालदार भारती भवारी व पोलीस नाईक नदीम तडवी हे करीत होते. निखील च्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स प्राप्त करण्यात आले. पोलीस हवालदार महेश पटारे यांनी प्राप्त कॉल डिटेल्यचे तांत्रिक विष्लेशन केले. त्यानुसार एक ऑगस्ट रोजी निखील घोलप व त्याचे नातेवाईक चुलत चुलते अभिषेक प्रकाश घोलप व जितेंद्र पांडुरंग घोलप यांचेत वेळोवेळी कॉल झाल्याचे तसेच निखील चा मोबाईल बंद झाला त्यावेळी तीघांचे लोकेशन एकाच परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अभिषेक घोलप व जितेंद्र घोलप यांचेकडे चौकशी करून पोलीस खाक्या दाखवल्यावर त्यांनी कबूल केले की, सुमारे ३ वर्षापासुन शेतजमिन वहीवाटीचे कारणावरून त्यांच्या बरोबर भांडणे असून सुमारे ५ महीन्यांपासुन त्यांचा मुलगा निखील घोलप हा सुद्धा त्याचे वडील संदिप घोलप यांचे प्रमाणेच शेतजमीन वहीवाटीचे कारणावरून आम्हाला तसेच आमचे कुटुंबातील सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करून वारंवार त्रास देत असल्याने, त्याचे त्रासाला कंटाळुन आम्ही दोघांनी त्याला खल्लास करायचे ठरवले. त्याप्रमाणे एक ऑगस्ट रोजी निखील घोलप व आमचेत वेळोवेळी फोन कॉल झाले असुन निखील हा जुन्नर येथे असल्याचे समजल्याने आम्ही होंडा शाईन मोटार सायकल नं.एम.एच.१४.एच.एच.६५७८ वरून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुन्नर जुने एस.टि. स्टँडचे जवळील नवीन कमान येथुन निखील घोलप याला मोटार सायकलवर बसवून घेऊन जुन्नर-घोडेगाव -तळेघर मार्गे मौजे फळोदे, ता. आंबेगाव, जि.पुणे गावचे हद्दित गार मावलाया नावाचे डोंगर उतारावरील रोडवर घेऊन जावुन तेथे निखील याचे डोक्यावर व छातीवर दगडाने मारून खुन केला व त्याची बॉडी कोणाला दिसुन येवु नये म्हणुन उचलुन रोडचे खाली खोलवर खड्डयात टाकुन दिली. तसेच निखीलचा एन्ड्रोइड मोबाईल जुन्नर येथील पाताळेश्वर महादेव मंदीराचे जवळील नदीचे पात्रात टाकुन घरी निघुन आलो अशी खूनाचा कबुली दिली.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मौजे फळोदे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे घटनास्थळी खात्री करणेसाठी जात असता तेथील पोलीस पाटील विजु मेमाने यांना पोलीसांनी संपर्क करून घटनास्थळी बोलावले.१५ ऑगस्ट रोजी सदर घटनास्थळावरून एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत मिळुन आले असुन घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून रजिस्टरी नोंद झाली असल्याची पोलीस पाटील मेमाने यांनी माहिती दिली. त्याप्रमाणे घोडेगाव पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता सदर पुरूष जातीचे प्रेताचे वर्णन, अंगावरील कपडे हे निखील संदिप घोलप याचे वर्णनाशी मिळते जुळते असल्याची खात्री पटली.त्यानुसार नदीम तडवी यांनी अभिषेक प्रकाश घोलप व जितेंद्र पांडुरंग घोलप यांचेविरूद्ध ता.१८ ऑगस्ट रोजी सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद नोंदवली असून दोन्ही आरोपींना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.जी थाटे करीत आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस हवालदार महेश पटारे, दिनेश साबळे, नामदेव बांबळे,भारती भवारी,विलास कोंढावळे,शंकर कोबल,पोलीस नाईक नदीम तडवी, ज्योतीराम पवार, रोहीत बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे,शामसुंदर जायभाई,संतोष भोसले, संदिप भोते, अतुल भेके,राजेंद्र आमले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img