23.1 C
New York

Sharad Pawar : बदलापूरच्या संतापजनक घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मोठ्याप्रमाणात राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष राज्यभर आपली ताकद वाढण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाकडूनही अशाच हालचाली सुरू आहेत. दरम्यान एका पत्रकारपरिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, राज्यातील जनतेला आता परिवर्तन हवं आहे, असं विधान केलं.

यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार साहेब म्हणाले की, जनतेला आता परिवर्तन हवं आहे. लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाहायला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची 4 आणि काँग्रेसची केवळ 1 लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते असं मत शरद पवार यांनी मांडलं.

शरद पवार म्हणाले की, आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या. तुमचं एनसीपीत अंत:करणापासून स्वागत, असा शब्दांत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. अनेक वर्षे तुम्ही शैक्षणिक जीवनात काम करत आहात. सरकार आणण्यासाठी सामूहीक प्रयत्न करावे लागतील. तुमचे सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही येण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्याचा पुरेपुर उपयोग परिवर्तनासाठी केला पाहिजे असंदेखील आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img