28.9 C
New York

Mumbai: अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा…

Published:

Mumbai:मुंबई पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यचळामुळे या कारवाईत अडथळे येत होते. पालिकेने कारवाईची पकड तीव्र करण्यासाठी पालिकेकडून निर्मूलन व अतिक्रमण विभागाकडून १११ निरीक्षकांची भरती करण्यात येत असून येणाऱ्या ४ सप्टेंबर ला परीक्षा होणार आहे. या भरतीमुळे या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला आणखीन वेग येईल, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

या भरतीसोबतच कारवाईची वाहने देखील वाढवण्यात येणार असल्यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर आता जरब बसणार आहे. रेल्वे परिसरात १७० मीटर पर्यंत फेरीवाल्याना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र नियमांच उलंघन करून फेरीवाले आपले बस्थान पुन्हा मांडून बसतात.(Mumbai)मुंबईतील दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, , सीएसटी, इत्यादी रेल्वे स्थानक फेरीवाल्यांची आपल्या जाळ्यात वेधून घेतले आहेत. त्यामुळे सकाळ व संध्यकाळच्या वेळेस प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, प्रशासनाच्या वतीने, रस्त्याचा वापर करत असताना अडथळा ठरणारे फेरीवाले, तसेच आरोग्यासाठी अपायकारक असणाऱ्या उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते. अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी,अशा सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्यात. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे विविध भागात कारवाई करण्यास अडथळा येत आहे.

बदलापूर घटना दुर्दैवीच; विरोधकांनी आंदोलनाला राजकीय वळण दिलं, मुख्यमंत्र्यांचा आरोप

रेल्वे स्थानक परिसरात कारवाईस अडथळा-

ही कारवाई दोन सत्रांत म्हणजेच सकाळी ८ ते ४ आणि दुपारी ३ ते ११ या दरम्यान करण्यात येते. विशेषता कारवाईच्या वेळेस रेल्वे स्थानक परिसरात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्याअभावामुळे मोठ्या क्षेत्रात कारवाई करणे कठीण जाते, अशी माहिती अतिक्रमण विभागातील अधिकारी देतात. भरतीमुळे कारवाईला वेग येईल आणि कारवाईनंतरही पुन्हा फूटपाथवर दुकाने मांडणाऱ्याऱ्यांवर नियंत्रण राहील. याचसोबत वाहनांच्या संख्येतही वाढ केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोकळ्या पदपथांचा अनुभव घेता येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img