26.6 C
New York

ICC Ranking : वनडे रॅंकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच वर्चस्व कायम

Published:

निर्भयसिंह राणे

आयसीसी वनडे रँकिंगवरून (ICC Ranking) मागील आठवड्यात मोठा वाद निर्माण झाला होता, विशेषतः बाबर आझमच्या पहिल्या स्थानामुळे. तथापि, आयसीसीने एकही वनडे सामना न खेळवता नवीन वनडे रँकिंग जाहीर केली आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा वर्चस्व दिसून येत आहे. टॉप 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय आहेत व बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर आहे, त्याची रेटिंग 824 आहे, पण त्याने मागील आठ महिन्यात एकही वनडे सामना खेळलेला नाही.

Jay Shah : बीसीसीआयचे सचिव जय शाह बिनविरोध आयसीसी अध्यक्ष ?

दुसऱ्या स्थानावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आहे, ज्याची रेटिंग 765 आहे. श्रीलंका दौऱ्यात रोहितने दोन अर्धशतकं ठोकल्यामुळे त्याला चांगलाच फायदा झाला आहे. तिसऱ्या स्थानावर शुबमन गिल असून त्याची रेटिंग 763 आहे. विराट कोहली आणि आयर्लंडचा हॅरी टॅक्टर चौथ्या स्थानावर आहेत, दोघांचीही रेटिंग 746 आहे. सध्या एकही वनडे सामना न खेळल्यामुळे रँकिंगमध्ये मोठे बदल होणे शक्य नाही, त्यामुळे कसोटी आणि T-20 मालिकांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

वुमन्स वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधाना तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, तिची रेटिंग 738 आहे. हरमनप्रीत कौर नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या नॅटली सिवर ब्रंट 783 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण अफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ड्ट 756 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू 727 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी 704 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img