17.4 C
New York

Bharat Bandh : आज ‘भारत बंद’ची हाक; वाचा, काय राहणार सुरु अन् काय राहणार बंद?

Published:

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एससी आणि एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात क्रिमीलेअरबाबतचा निर्णय दिलायं. (Bharat Bandh) या निर्णयाविरोधात देशभरात भारत बंदची हाक देण्यात आलीयं. आरक्षण बचाव संघर्ष समितीसह देशातील दलित संघटनांकडून आज 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलायं.

भारत बंदच्या पार्श्वभमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावलं उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यांना एससी आणि एसटी गटांमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे सर्वाधिक गरजू लोकांना आरक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे.

Bharat Bandh काय बंद, काय सुरू?

आरक्षण बचाव संघर्ष समितीनं आंदोलनाला एकजूट दाखवण्यासाठी सर्व व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बाजार समित्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्यानं देशभरातील बाजारपेठा त्याचं पालन करतील की नाही हे अनिश्चित आहे. बंदमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खासगी क्षेत्रातील कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता असली तरी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

Bharat Bandh भारत बंदला कोणाचा पाठींबा?

दलित आणि आदिवासी संघटनांशिवाय विविध राज्यांतील प्रादेशिक राजकीय पक्षही भारत बंदला पाठिंबा देत आहेत. बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी (काशीराम), भारत आदिवासी पार्टी, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, लोजप (आर) आणि इतर संघटनांच्या नावांचा समावेश यामध्ये प्रामुख्यानं आहे. काँग्रेसनंही बंदला पाठिंबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असून तो मागे घेण्यात यावा, असं या संघटनांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img