बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या (Badlapur Update) दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता 24 ऑगस्टपर्यंत आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्यानंतर आज आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आता कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.
यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेले कृत्य याबाबत तपास करायचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत 24 ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे.
बदलापूर घटना दुर्दैवीच; विरोधकांनी आंदोलनाला राजकीय वळण दिलं, मुख्यमंत्र्यांचा आरोप
Badlapur Update कल्याण न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
Badlapur Update नेमकं प्रकरण काय?
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेतील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणार्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे.