-0.9 C
New York

IMA : डॉक्टरांच्या संघटनांत महिलांना नगण्य स्थान! ४६ पैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद

Published:

देशातील डॉक्टरांची शिखर संघटना म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (Indian Medical Association)पाहिले जाते. या संघटनेतच महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व आतापर्यंत न मिळाल्याची बाब समोर आली आहे. देशभरात आयएमएच्या अंतर्गत असलेल्या ४६ डॉक्टर संघटनांपैकी केवळ ९ संघटनांचे नेतृत्व सध्या महिला डॉक्टर करीत आहेत. आयएमएच्या (IMA) राष्ट्रीय अध्यक्षपदी आतापर्यंत केवळ एकच महिला डॉक्टर विराजमान होऊ शकली आहे.

जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थने केलेल्या अभ्यासातून हि बाब समोर आलीय. या अभ्यासानुसार, इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना १९२८ मध्ये झाली.त्या काळापासून असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षपद केवळ एकाच महिलेने भूषवले आहे. आयएमएच्या अंतर्गत देशभरात ४६ संघटना आहेत आणि त्यापैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद महिला डॉक्टरांकडे आहे. असोसिएशनमध्ये सुरुवातीपासूनच पुरूष डॉक्टरांचे वर्चस्व राहिले आहे. महिलांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने त्यांच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष झाले आहे.

बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

देशभरात आयएमचे सुमारे साडेतीन लाख सद्यस्य आहेतडॉक्टरांचे हित आणि संरक्षण जपण्याचे काम हि संघटना करीत आहे. . मात्र महिलांना प्रतिनिधित्व देण्यात ही संघटना कमी पडली आहे. आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्षपद आतापर्यंत एकाही महिला डॉक्टरकडे गेलेले नाही. हीच परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील इतर संघटनांची आहे. नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरमचे अध्यक्षपद एकदाच महिलेला मिळाले आहे. याचवेळी फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज इंडियाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात केवळ १५ टक्के महिला अध्यक्ष आहेत, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

महिला डॉक्टर त्यांची कारकीर्द स्थिरस्थावर झाल्यावर आयएमएम मध्ये प्रवेश करत होत्या.. गेल्या १० ते १२ वर्षांत हे चित्र बदलले आहे. महिला डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. असे असले तरी संघटनेत महिलांची संख्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. भविष्यात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img