-2.7 C
New York

Rajya Sabha : रायगडमध्ये भाजपने ताकद वाढली ! धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची ‘लॉटरी’

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यसभा पोटनिवडणुकीचे (Rajya Sabha) बिगुल वाजले असून राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजपने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी आसाम, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडीसा, राजस्थान आणि त्रिपुरा या आठ राज्यातील 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये आसाममधून दोन उमेदवार तर उर्वरीत राज्यातून प्रत्येकी एक उमेदवार देण्यात आला आहे.

राज्यसभेच्या राज्यातील दोन जागा रिक्त झालेल्या आहेत, यासाठी निवडणूकही जाहीर झालेली आहे. भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धैर्यशील पाटील हे शेकाप पक्षाचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार आहेत. ते भाजपमध्ये आहेत. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने एकप्रकारे रायगडमध्ये आपली ताकद वाढविली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img