8.4 C
New York

Badlapur Rape Case : बदलापूर प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Published:

पुणे

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या (Badlapur Rape Case) घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूरमध्ये चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शाळेतील सफाई कामगारानेच दोन मुलींवर काही दिवसांच्या अंतराने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यानंतर बदलापूरकर संतप्त झाले त्यांनी रेल्वे रोको केला, रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. राज्याच्या विरोधी पक्षांनीही या घटनेची दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अशा नराधमांना सार्वजनिक ठिकांणी सर्वांसमक्ष फाशी दिली पाहिजे. एकदा तरी अशी शिक्षा दिल्याशिवाय अशा नराधमांना जरब बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देत आहात. त्याचं मनापासून स्वागत करतो. पण पैसे देऊन प्रश्न सुटत नाही. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील सरकारचीच आहे ना? या घटनेचा उच्च स्तरावर तपास झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तसंच, लोकांचा रोष आहे. ते रस्त्यावर येऊन दगड का फेकत आहेत? त्यांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही? माझ्या कानावर आलं आणि माध्यमांकडून देखील सांगण्यात येत आहे की, पीडित मुलींचे पालक बारा ते अठरा तास न्याय मागत वणवण फिरत होते. पण तरीही एकाही पोलिस स्टेशनने त्यांची दखल घेतली नाही. हा न्याय आहे का? महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र असून यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात लेकीला न्याय मिळत नसेल तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. असंही सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img