23.1 C
New York

Badlapur : फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, बदलापूर घटनेनंतर विरोधक आक्रमक

Published:

मुंबई

बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार पकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. बदलापूरच्या (Badlapur) घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. एकूणच गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी लागलेला वेळ आणि हयगय यावरुन आज सकाळपासून बदलापूरात एकच संताप व्यक्त झाला. रेल्वेसह बस सेवा कोलमडली. आंदोलन चिघळले. शाळेत तोडफोड करण्यात आली. जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर अंधारे यांनी फडणवीसांवर जहाल टीका केली.

मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. खरं सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवर उडाला आहे पोर्श कारचे प्रकरण, वरळीतील मिहीर शाह आणि पनवेल ची घटना असेल, मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहे अस टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या, तुम्हाला खरच लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या सुरक्षित असेल तरच त्यांना अश्वस्त वाटेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला अकरा वर्षे पूर्ण होतात एक अत्यंत हुशार सहिष्णुतावादी विचारवंत कट्टर पंथीयांमुळे मारला जातो पण कट्टर पंथीयांचा विचार संपत नाही धर्म विद्वेषी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री उभे राहत असतील तर कट्टर पंथीयांचा विचार हा असाच फोफावत राहील पुन्हा भविष्यात एखादा दाभोळकर होऊ नये यासाठी कट्टर पंथीयांचा बंदोबस्त काय करणार आहात असा सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img